अयोध्या श्रीराम मंदिर उदघाटन सोहळा आगमन व दर्शन समितीच्या प्रमुखपदी अँड.किशोर काळकर.

Spread the love

एरंडोल :- प्रदेश भारतीय जनता पक्षाच्यावतीने अयोध्या येथील ‘प्रभू श्रीराम मंदिर दर्शन,व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली असून व्यवस्थापन व दर्शन
समितीच्या प्रमुखपदी भाजपच्या जनजातीय क्षेत्राचे समन्वयक अँड.किशोर काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नडडा यांचे आदेशावरून प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे
यांनी अँड.काळकर यांचेसह अन्य चार समिती प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नवी दिल्ली येथे भाजपच्या केंद्रीय कार्यालयात नुकतीच श्रीराम दर्शन अभियान व लोकसभा निवडणूक पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेसह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, संघटनमंत्री बी.एल. संतोष,सुनील बन्सल,तरुण युग यांनी आयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन अभियान आणि लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले.बैठकीस राज्यातून अँड.किशोर काळकर,लक्ष्मणराव सावजी,राजेश पांडे,संजय उपाध्याय,संतोष ठाकूर हे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व राज्यातील विविध समित्यांची स्थापना करण्यात
आली.

महाराष्ट्रातील प्रभू श्रीराम मंदिर दर्शन,आयोध्या व्यवस्थापन समिती सदस्यांची पुढीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये चार समित्यांच्या समावेश असून आगमन व दर्शन समितीच्या प्रमुखपदी अँड.किशोर काळकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रम नियोजन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची तर रेल्वे प्रवास समितीच्या प्रमुखपदी पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच भोजन समितीच्या प्रमुखपदी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव सावजी यांची निवड करण्यात आली.

अँड.किशोर काळकर पक्षाच्या जनजातीय क्षेत्राचे प्रदेश संयोजक असून त्यांनी यापूर्वी उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचे संघटनमंत्री म्हणून काम पाहिले आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी काढलेल्या रथयात्रेच्या उत्तर महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी अँड.किशोर काळकर यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चारही समितीच्या प्रमुखांना निवडीचे पत्र दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,अदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री अतुल सावे,मंत्री सुधीर मूनगंटीवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचेसह पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी अँड.किशोर काळकर यांचेसह सर्व समिती प्रमुखांच्या निवडीचे स्वागत केले.पक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी दिली असून आयोध्येत दर्शनासाठी येणा-या राज्यातील भाविकांना सर्वप्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अँड.किशोर काळकर यांनी सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार