विनयभंग वॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितास आमच्या ताब्यात द्या. पीडितेसह नातेवाईकांनी केले ठिय्या आंदोलन

Spread the love

जामनेर :- विवाहितेचा विनयभंग केलेल्या संशयितास तिच्या नातेवाईकांनी जाब विचारला असता संबंधित तरुणाने शिवीगाळ व मारहाण केली.ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी घडली. जामनेर पोलिसांनी गारखेडा येथून संशयितास अटक केली.या पीडितेसह नातेवाईकांनी जामनेर पोलिस ठाण्यासमोर संशयितांना आमच्या ताब्यात द्या, यासाठी धुडगूस घालत ठिय्या आंदोलन केले.

या वेळी संतप्त नातेवाईकांकडून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.फिर्यादी महिला तीन महिलांसोबत संशयित केशव माधव शिंदे (रा. गारखेडे खुर्द, ता. जामनेर) यांच्या शेतात कामावर गेली होती. संशयित शिंदे याने फिर्यादी महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले. याबाबत महिलेने पती, सासू व सासऱ्यांना सांगितले.

महिलेचे नातेवाईक गुरुवारी सकाळी संशयिताच्या घरी गेले असता संशयित आशिष श्रीराम शिंदे (रा. गारखेडे, ता.जामनेर) याने शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिल्याची व केशव शिदे याने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार