सांगली :- येथील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पीडित पालकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला आहे. सांगली शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत शाळेतील एका शिक्षकाने अश्लील चाळे केले होते. विद्यार्थीनीने घाबरून तिच्या सोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी अन्य विद्यार्थीनींसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले.या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले. अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला. झालेला प्रकार हा अतिशय निंदनिय आहे. पालक आणि विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता.
या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मनसे महिला आघाडीच्या सरोजा लोहगावे, जमीर सनदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकांमध्ये संताप…
घटनेनंतर मुलीचे आई वडील आणि पालक शाळेत मुख्यध्यापक आणि शिक्षकाला जाब विचारण्यास गेले होते. यावेळी बोलताना पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाला मारहाण केली. या प्रकारामुळे पालक संतापलेले पाहायला मिळाले. असं असेल तर आमच्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं? असा सवाल पालकांनी विचारला.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.