मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने 11 कोटींची देणगी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे शनिवारी 6 जानेवारी रोजी सुपूर्द करण्यात आला.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अयोध्येला जाऊन चंपत राय यांची भेट घेतली
आणि पक्षाच्या वतीने हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केल्यावर शिवसेना पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ” आज संपूर्ण महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ११ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.
ते कायम म्हणायचे की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मिरातून कलम 370 हटवेन आणि अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे काम करेन. स्वर्गीय बाळासाहेबांचे तेच स्वप्न आता पूर्ण होते आहे. त्यामुळे प्रभू श्री राम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांना मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






