पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर दिवसाढवळ्या बेछुट गोळीबारात मृत्यू, हॉस्पिटलबाहेर तोबा गर्दी.

Spread the love

पुणे :- पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता. बाईकवरुन हल्लेखोर आले होते. त्यांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या. सह्याद्री रुग्णालयात शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता.

दरम्यान गुंड शरद मोहोळचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आला आहे. गोळीबारामध्ये मोहोळचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मोहोळचा मुक्त देह ससूनमध्ये आणण्यात आला आहे. या ठिकाणी मोहोळ समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ससूनमध्ये तैनात करण्यात आलेला आहे

कोण होता शरद मोहोळ?

संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ गुन्हेगारी जगात समोर आला. या गोष्टीला १५ ते १६ वर्ष झाली. शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई – वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. मात्र पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली त्यांनतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला.

त्यानंतर शरद मोहोळ याच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले. लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण शरद मोहोळने केल्याचे वृत्त होते.पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. मात्र तो गुन्हा करायचा तुरुंगात जायचा आणि बाहेर यायचा. यानंतर अनेक प्रकरणात शरद मोहोळवर गुन्हे दाखल झाले.

हे पण वाचा

टीम झुंजार