गोरखपूर :- प्रेमासाठी तरुण तरुणी काय करतील, कोणत्या थराला जातीय याचा नेम नाही. बॉयफ्रेंडला रात्रीचे भेटता यावे म्हणून एक तरुणी आई वडिलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या देत होती. ते झोपी गेल्यावर हळूच बॉयफ्रेंड तिच्या घरी येत होता व ते जागे होण्यापूर्वी जातही होता.तीन महिन्यांपासून सुरु असलेला हा खेळ अखेर थांबला आहे. कसा तो पहा…मांजर डोळे बंद करून दुध पिते, तिला वाटते कोणी पाहत नाहीय… ही म्हण आठवली असेल. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडला आहे.
परवा, बुधवारी रात्री तरुणीची पोलखोल झाली आणि तिच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तरुणी तिच्या आई वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन निवांत झोपवत होती, परंतु शेजारी, गल्लीतील लोक जागे असायचेच. एक तरुणा रात्री उशिरा आपल्या गल्लीतून जातोय हे तेथील काहींनी पाहिले होते. त्यांनी माग काढला असता तो तरुण त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या तरुणीच्या घरी जात असल्याचे समजले. त्यांनी या तरुणीच्या वडिलांना सावध केले. तरुणीचा बॉयफ्रेंडला भेटण्याचा प्लॅन ठरला.
तिने तिच्या आई वडिलांना जेवणातून झोपेची गोळी दिली. परंतु, तिच्या आई-वडिलांनी ते जेवण जेवलेच नाही. जेवण लपवून त्यांनी नेहमीच्या वेळेप्रमाणे झोपेचे नाटक केले. तरुणीने तिच्या प्रियकराला तसा मेसेज दिला. तो घरी आला असता थोड्या वेळाने आई वडील उठले आणि त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर शेजारी आणि गल्लीतल्या लोकांनाही बोलविण्यात आले. या सर्वांनी मिळून तरुणाला चोप चोप चोपले. त्याच्या घरच्यांनाही बोलविण्यात आले. यानंतर भांडण सुरु झाले. यामुळे अखेर पोलिसांना बोलवून त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.