पुणे :- मद्यप्राशन करुन तरुणीने धिंगाना केला. पुणे शहरातील वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. मद्याच्या नशेच्या अमलाखाली असलेल्या या तरुणीने सोसायटीचे गेट बंद केले. सोसायटीतून कोणाला बाहेर जाऊ दिले नाही. बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांना ती मारहाण करु लागली. शिविगाळ करत तिने प्रचंड उपद्रव केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
महिला पोलिसांनाही मारहाण
पुण्यामधील मद्यधुंद तरुणीच्या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशी वैतागले. तिला समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती ऐकण्यास तयार नव्हती. यामुळे सोसायटीतील रहिवाश्यांनी पोलिसांना बोलावले. परंतु तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतले. तसेच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असे रहिवाशांनी सांगितले. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिला लगेच सोडून देण्यात आलं असं सोसायटीतील रहिवाशांच म्हणणे आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असताना तिने महिला पोलिसांना मारहाण केली तरी गुन्हा दाखल झाला नाही.
पुणे ओळख हरवू लागलेय…
पुणे शहर शिक्षणाचे आणि संस्कृतिचे माहेर आहे. परंतु आपली संस्कृती पुण्यातून हरवत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. पुण्यात अमली पदार्थांचे रॅकेट अनेक वेळा समोर आले आहे. पुण्यात रेव्ह पार्टीचे प्रकार घडले आहे. यामुळे पुणे आपली ओळख हरवत असल्याची चिंता पुणेकरांना लागली आहे. पोलीस अधिकाऱ्यांची मुले नियम मोडत असल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु सर्वसामान्य व्यक्तीस किरकोळ प्रकरणातही पोलिसांकडून पोलीस धाक दाखवला जातो. यामुळे कायदा सर्वांना सारखा असतो, हे पुन्हा दाखवून देण्याची गरज आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






