Viral Video:एक तरुणीच्या भन्नाट स्टेप्स अन् हावभाव व जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. चिमुकल्यांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना डान्स करायला आवडतो. काही लोक डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा शेअर करतात. घरगुती कार्यक्रमात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने डान्स करतात. काही घरगुती कार्यक्रमातील व्हिडीओ तुफान चर्चेत राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी जबरदस्त डान्स करतान दिसत आहे. या तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काहींना हा डान्स पाहून त्यांच्या भावंडाची किंवा मित्र मैत्रीणींचा आठवण येऊ शकते.

लग्नसराई असो किंवा कोणताही घरगुती कार्यक्रम डान्स हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. असाच एका कार्यक्रमात डान्सचा आनंद घेणाऱ्या तरुण मुलामुलींचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी तुफान नाचताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही अवाक् होईल पण डान्स करणाऱ्या या तरुण मंडळीच्या घोळक्यात एक तरुणी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

डान्स करतानाची ऊर्जा पाहून कोणाचेही लक्ष तिच्याकडे जाईल. ‘भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा’ या गाण्यावर ते सर्व डान्स करताना दिसत आहे. सध्या हे गाणं खूप ट्रेंडीगवर आहे.

danceisloves या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘जय श्री राम’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘खूप छान’ तर एका युजरने लिहिलेय, ‘खूप छान डान्स केला’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘या मुलीची एनर्जी पाहून असं वाटते की तिच्या शरीरात आत्मा गेली’ अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/reel/C1OfumjLO9M/?igsh=MTRmMTRrcXY1Z3JnNw==

हे पण वाचा

टीम झुंजार