बलात्काराचे आरोप झालेल्या काँग्रेसचे तीन वेळेस आमदार राहिलेल्या नेत्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने केलं निलंबन.

Spread the love

नवी दिल्ली:- राजस्थानमधील बलात्कार प्रकरणात अडकलेले काँग्रेस नेते आणि बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दोन कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वृद्ध व्यक्तीसोबत एक महिला आणि एक लहान मुलगी आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मेवाराम जैन असल्याचा दावा केला जात आहे.पीडितेने मेवराम जैन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

उच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्या विरोधात जोधपूरच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करताना एका विवाहित महिलेने दोन अश्लील व्हिडिओंचा उल्लेख केला होता. विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा जोरात मांडण्यात आला होता.मेवाराम जैन हे बाडमेरचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. यावेळीही काँग्रेसने त्यांना तिकीट दिले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते अशोक हे गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेहलोत यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता.

दरम्यान, भाजपकडून या व्हिडीओचा दाखला देत काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राहुल गांधी यांच्यासोबतही मेवाराम जैन यांचे फोटो व्हायरल झाले होते. जोधपूरच्या राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये एका विवाहितेने मेवाराम जैन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. महिलेने आरोप केला आहे की, मेवाराम आणि त्यांचे सहकारी रामस्वरुप आचार्य यांनी बलात्कार केला. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबरही लैंगिक चाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.महिलेच्या तक्रारीवरून मेवाराम जैन आणि आरपीएस आनंद सिंह राजपुरोहित यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेवाराम जैन यांच्या अटकेवर २५ जानेवारीपर्यंत स्थगिती

बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली आणि पीडितेचा जबाबही नोंदवला. याप्रकरणी मेवाराम जैन यांनी न्यायालयाचा आसरा घेतला होता. त्यानंतर हायकोर्टाने दिलासा देत 25 जानेवारीपर्यंत अटकेला स्थगिती दिली. तपासात सहकार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टीम झुंजार