बेगुसराय :- नववर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केलं.या आगीत चौघांचाही होरपळून मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या बेगुसरायमध्ये सोमवारी (१ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. नीरज पासवान, कविता देवी, लव (वय ५) आणि कुश (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. आगीच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत नीरज पासवान पत्नी कविता आणि दोन चिमुकल्या मुलांसह बेगुसराय जिल्ह्यातील नवतोलिया गावात राहत होते. सोमवारी नीरज यांनी पत्नी आणि दोन मुलांसोबत नववर्षाचं सेलिब्रेशन केलं. रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र, त्याचवेळी अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला.
गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. संपूर्ण पासवान कुटुंबीय आगीत होरळून गेलं.आगीची माहिती मिळातच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृत कविता देवी ८ महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






