नवी दिल्ली : गुरुग्राम येथे राहणाऱ्या एका तरुणाने काल उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गौरव शर्मा असं आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गौरव याच्यावर त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा संशय होता. कारण ३१ डिसेंबर रोजीच त्याची पत्नी घरात मृतावस्थेत आढळली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असणारा गौरव शर्मा हा आपल्या पत्नी आणि मुलासह गुरुग्राम येथील डीएलएफ परिसरातील एका इमारतीत वास्तव्यास होता.
सहा महिन्यांपूर्वीच ते या घरात राहण्यासाठी आले होते. मात्र ३१ डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृतावस्थेत आढळून आली. तेव्हापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.अटकेच्या भीतीने धास्तावलेला गौरव शर्मा काल सकाळी साडेदहा वाजता कौशांबी मेट्रो स्थानकावर पोहोचला आणि त्याने रेलिंगवरून खाली उडी घेत आपलं जीवन संपवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आईच्या मृतदेहाशेजारी आढळलं लहान मूल!
पत्नीच्या हत्येनंतर गौरव शर्मा घरातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस डीएलएफ परिसरातील दाखल झाले. तेव्हा त्यांना घरात गौरवच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. तर त्यांचं लहान मूल आपल्या आईच्या मृतदेहाशेजारी रडत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, गौरवने त्याच्या पत्नीची कोणत्या कारणामुळे हत्या केली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






