Viral Video: नवरा-बायकोमध्ये वाद होणं, ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये वाद होत असतात. नवरा बायकोच्या वादामधील एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या वादातील ट्वीस्ट म्हणजे दोन बायका आणि नवऱ्याचा वाद सुरु आहे. नवऱ्याचं पितळ त्याच्या बायकांसमोर उघड झालं आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला उभे राहून दोन महिला आणि एका पुरुषामध्ये वादावादी सुरु आहे.
दोन महिलांमध्ये नवऱ्यावरुन वाद सुरु असतो. नवरा दोघींमधील वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असतो. तरी देखील दोघी ऐकण्याचे नाव घेत नाहीत. पती एका पत्नीला रिक्षामध्ये बसवण्याच्या प्रयत्न करत असतो. परंतु रिक्षामध्ये न बसता ती महिला पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत पुना वाद घालते. कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. शेवटी पती दोघींनाही शांत करुन रिक्षामध्ये बसवतो.सोशल मीडिया एक्स(twitter)वरील @gharkekalesh या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नक्की व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






