धक्कादायक! विवाहितेच्या शारीरिक, मानसिक छळ, 50 लाख रुपये घेवून ये तिने दिला नकार म्हणून जे घडल ते भयानक

Spread the love

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथल्या एका विवाहित महिलेला तिच्या एनआरआय पतीने थायलंडमधल्या घरातून बाहेर काढलं. ती विवाहित महिला कशीबशी ग्वाल्हेरला आली.त्यांनी जिल्ह्याच्या एसपींकडे त्याची तक्रार केली. पोलिस ठाण्यात घेऊन तिने सांगितलं, की तिचा पती तिला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबतींत त्रास देतो. तसंच, तो तिच्याशी अनैसर्गिक कृत्यही करत असल्याचं तिने सांगितलं. तिच्या तक्रारी नंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या चार व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितलं आहे, की या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई केली जात असून, त्या महिलेकडूनही माहिती घेतली जात आहे.पोलिसांनी सांगितलं, की एक महिला दोन जानेवारीला एसपी म्हणजेच पोलीस अधीक्षकांच्या ऑफिसमध्ये आली. तिने एसपींना सांगितलं, की ‘मी ग्वाल्हेरमध्ये राहते. थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी माझं लग्न झालं आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच पतीने मला सांगितलं, की माहेरहून 50 लाख रुपये घेऊन ये. मी सांगितलं, की मी घरातल्यांकडून पैसे मागणार नाही. ते ऐकल्यानंतर पतीने मला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली.

तेवढंच नव्हे, तर त्याने माझ्याशी अनैसर्गिक कृत्यही करायला सुरुवात केली. त्याने दररोज मला खूप मारझोड करायला सुरुवात केली. 28 मे 2023 रोजी त्याने मला घराबाहेर काढलं.3 मे 2023 रोजी या ग्वाल्हेरच्या महिलेचा विवाह थायलंडमध्ये राहणाऱ्या आर्किटेक्टशी झाला. तिचा पती मूळचा भिंड इथे राहणारा आहे. थायलंडला गेल्यानंतर पतीने हुंड्यासाठी तिला निर्दयपणे मारझोड करून 28 मे रोजी घराबाहेर काढलं. तिथून ती कशीबशी भारतात परतली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना हा घडलेलाल प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असून, त्यानुसार तपास सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार