सायबर गुन्हेगारांनी बँकेत लिपिक महिलेला शेअर खरेदी-विक्रीच्या नावाखाली भरघोस लाभचे आमिष दाखवून तब्बल 24.48 लाखांची केली फसवणूक.

Spread the love

सायबर गुन्हेगाराने शेअर खरेदी-विक्रीच्या नावाखाली बँकेत लिपिक असलेल्या महिलेला 24 लाख 48 हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

नागपूर : सायबर गुन्हेगाराने शेअर खरेदी-विक्रीच्या नावाखाली बँकेत लिपिक असलेल्या महिलेला 24 लाख 48 हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.पीडित 34 वर्षीय महिला जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत राहते.

ती एका राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदावर कार्यरत आहे. 6 नोव्हेंबर 2023 रोजी ती घरी असताना ‘लिंक मोर’ या व्हॉट्स अॅप ग्रुपची अॅडमिन जेसिका नावाच्या महिलेने पीडितेला मॅसेज पाठवला. त्यात शेअर खरेदी-विक्रीची जाहिरात होती. पीडित महिलेने जेसिकाशी संपर्क केला असता तिने शेअर खरेदी-विक्रीत बक्कळ नफा मिळण्याचे आमिष दाखविले. लोभाला बळी पडून पीडिता जेसिकाच्या जाळ्यात अडकली. तिने पीडितेला एका ग्रुपमध्ये जोडले.ग्रुपमध्ये असलेले अनेकजण लाखात लाभ मिळाल्याचे स्क्रीन शॉट टाकत होते.

त्यामुळे पीडितेचा विश्वास बसला. पीडितेने शेअर खरेदीचा सपाटाच लावला. त्यांना ऑनलाईन लाभ दाखविला जात होता. भरघोस लाभ दिसत असल्याने पीडिता गुंतवणुकीची रक्कम वाढवत गेली. 7 डिसेंबरपर्यंत एकूण 24 लाख 48 हजार रुपये गुंतविल्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार