सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दरम्यान, एका नवविवाहित शिक्षकाने सुट्टीसाठी केलेला अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, जो वाचून शाळेतील मुख्याध्यापकांसह इतर कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. शिक्षकाने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सुट्टी हवी आहे, असे अर्जात म्हटले आहे. मात्र, सुट्टीमागचे कारण जाणून अनेकांना हासू आवरणार नाही.
अर्जदार शिक्षकाने आपल्या अर्जात असे म्हटले आहे की, नुकतेच माझे लग्न झाले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया वर नमूद केलेल्या तारखेला मला अनौपचारिक रजा द्यावी, जेणेकरून त्या दिवशी मला माझ्या मेहुणीसोबत सुट्टीचा आनंद घेता येईल. यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर या अर्जाची तुफान चर्चा सुरू आहे.
हा अर्ज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BiharTeacherCan नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आले. या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स केले. त्याचबरोबर अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया समोर आल्या. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, अशा वेळी कुटुंबियांची आठवण तर येतेच. दुसऱ्याने म्हटले आहे की, सासरी चांगलीच सोय आहे. तर, तिसऱ्याने भावाला बायकोपेक्षा मेहुणी जास्त आवडत आहे, असे म्हटले आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






