एरंडोल :- येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक हे परिवारासह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून
सुमारे एका लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.दरम्यान शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून
चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याबाबत माहिती अशी,की येथील श्री साईगजानन महाराज मंदिरासमोरील रामचंद्र नगर मधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक विकास रामदास पिंगळे हे शुक्रवारी (ता.५)आई,वडील,भाऊ यांचेसह पुणे येथे लहान भावाकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
सोमवारी (ता.८) विकास पिंगळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील पंडित महाजन यांना मोबाईलवरून पाण्याची नळी मंदिरात ओढून घ्या से सांगितले.त्यावेळी पंडित महाजन यांनी तुमच्या घराचा मागील दरवाजा शनिवार (ता.६) पासून उघडा असल्याचे सांगितले.त्यानंतर विकास पिंगळे यांनी पंडित महाजन यांना लहान मुलास घरात पाठवून व्हीडीओ कॉल करण्याचे सांगितले.घरी चोरी झाल्याचे
समजताच पिंगळे पर्वारातील सदस्य एरंडोल येथे आले.त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.
तसेच घरातील दोन गोदरेजचे कपाटे खोलून त्यातील सामान घरात सर्वत्र पसरलेला दिसला.त्यांनी घरात असलेल्या सोन्याचे दागिने पाहिले असता दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंघट्या,पाच ग्रॅम वजनाची देवाची मूर्ती यासह विविध सोन्याचे व चांदीचे दागिने असा सुमारे ९७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकला होता, तसेच घरात असलेले सोनेरी रंगाचे कव्हर असलेला फोटोचा अल्बम मागच्या बाजूस फेकला होता.याबाबत विकास पिंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून
पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,उपनिरीक्षक शरद बागल यांनी भेट देवून पाहणी केली.दरम्यान शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमध्ये किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.