चुरू:- प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पत्नीच्या पाया पडत पतीने विनवणी केल्याची घटना घडली. चुरू जिल्हा मुख्यालयातील एसपी कार्यालयात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.पण, पतीच्या विनण्यानंतरही तिने पती आणि दोन निरागस मुलांना सोडून सर्वांसमोर प्रियकराचा हात धरला. तिची दोन्ही मुलंही आईसमोर रडत राहिली, विनवणी करत राहिली पण तिच्या मनाला पाझर फुटला नाही. ही विवाहित महिला गेल्या आठ महिन्यांपासून तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती.
जवळपास आठवडाभरापासून ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.आपल्या जीवाला धोका असून सुरक्षेची मागणी करण्यासाठी तिने सोमवारी प्रियकरासोबत चुरू एसपी कार्यालय गाठलं. पती आपला छळ करत असून दारू पिऊन मारहाण करत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. एसपी कार्यालयात पोहोचलेल्या राजगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील चिडिया दुधवा गावातील सोनमचा विवाह चुरू जिल्ह्यातील राजगढ तहसीलमधील लुडी झाबर गावातील रहिवासी विनोद कुमार जाट याच्याशी 2013 मध्ये झाला होता.
दोघांना 8 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी आहे. पती विनोद कुमार दारू पिऊन तिला मारहाण करत मानसिक छळही करायचा, असा आरोप सोनमचा आहे. पतीवर नाराज असल्याने सोनम अनेकदा माहेरी गेली होती. पण माहेरचे लोक तिला तिच्या नवऱ्याकडे परत पाठवायचे. सुमारे 8 महिन्यांपूर्वी, सोनमची हरियाणातील मोरका गावात राहणाऱ्या 27 वर्षीय अशोक कुमार जाट याच्याशी ओळख झाली, जो तिच्या शेजारी इलेक्ट्रिकल फिटिंगचे काम करण्यासाठी आला होता.पती आणि मुलांसोडून पत्नी प्रियकराकडे गेलीदोघेही फोनवर बोलू लागले.
त्यांच्यात जवळीक वाढत गेली. मग सोनमने पती आणि मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरापूर्वी 2 जानेवारीला ती आपले घर सोडून अशोक कुमारसोबत हरियाणाला गेली. ती अशोक कुमारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. सोमवारी सोनम तिचा प्रियकर अशोकसोबत सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचली.
पती मुलांसाठी विनवणी करत राहिला पण सोनमने ऐकलं नाही
ही बाब पती विनोदला समजताच तो आई आणि दोन्ही मुलांसह एसपी कार्यालयात आला. विनोदने हात जोडून पत्नीची माफी मागितली. तो तिच्या पाया पडत विनवणी करत राहिला. तो मुलांसाठी विनवणी करत राहिला पण सोनमने त्याचे ऐकले नाही. राजगड पोलिसांनी सोनमचा जबाब घेतला आहे. त्यामध्ये तिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत बोलले आहे. विनोद कुमार शेती करतात.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.