एरंडोल: – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्राबाबत केलेल्या वक्तव्याचा विविध हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करून निषेध केला.आमदार जितेंद्र आव्हाड यांचेवर त्वरित कारवाई करून त्याना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी पदाधिका-यांनी केली. हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने पोलीस निरीक्षक
सतीश गोराडे यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड कायम हिंदू देवदेवतांच्याबाबत वादग्रस्त विधाने करून अपमान करीत करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पदाधिका-यांनी व्यक्त केल्या.प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानास्पद शब्द वापरून
देशभरातील करोडो भक्तांच्या भावना दुखावल्या असून याबाबत त्यांचेवर कडक कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार जितेंद्र आव्हाड हेतूपुरस्करपणे वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. याबाबत शासनाने आमदार जितेंद्रआव्हाड यांचेविरोधात त्वरित कारवाई करावी अन्यथा हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणा त्यांच्या प्रतिमेश जोडे मारून निषेध केला.
यावेळी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राजा भेलसेकर, बजरंगदलाचे भरत महाजन, अँड.दिनकर पाटील, अँड.आकाश महाजन,अँड.अजिंक्य काळे,अँड.प्रेमराज पाटील,निलेश चौधरी,वैभवचौधरी, भूषण चौधरी,लोकेश महाले,विवेक ठाकूर,जय बडगुजर, प्रकाश महाजन, श्रीकांत कासार,योगेश सूर्यवंशी,प्रकाश पाटील,कमलेश सोमाणी,विजय गायकवाड, करण पाटील, पवन महाजन, नरेंद्र महाजन,प्रसाद महाजन,मयूर बिर्ला,
मयूर महाजन, वैभव महाजन,साईनाथ चौधरी,हरेश महाजन,गणेश महाजन,आकाश पाटील, मंगेश वारे, सिद्धेश वाघ,आनंद सूर्यवंशी,अतुल मराठे,भूषण बडगुजर, रोहण साळी, श्रीराम महाजन,योगेश देशमुख, गणेश नाळदे,नितीन महाले,पवन महाजन,पुरुषोत्तम महाजन,चंद्रकांत महाजन,लक्ष्मण महाजन,मनोज बिर्ला,विक्की सैंदाणे, विवेक मानुधने,वसंत पवार,सुनील पाटील,महेश पाटील, प्रेमचंद पाटील,मयूर वाणी,शुभम महाजन,सुमित जैस्वाल,नरेश डागा,दीपक ठाकूर, प्रमोद महाजन यांचेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.