ट्रकची मोटरसायकलला धडक एक ठार चार जखमी, संतप्त नागरिकांचे महामार्ग खोदून ठिय्या आंदोलन, 2 तास वाहतूक ठप्प.

Spread the love

एरंडोल : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या मोटरसायकल स्वारास वाचवण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटर सायकल स्वारांना ट्रकने दिलेल्या धडकेत धरणगाव येथील एक युवक जागीच ठार झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करून अपघात स्थळी गतिरोधक बसवण्याची मागणी केली. हा अपघात आज रात्री आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका येथे झाला.दरम्यान अपघात स्थळी यापूर्वी देखील अनेक अपघात झाले असून निष्पाप बळी गेले आहेत

याबाबत माहिती अशी की आज रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पारोळा कडून जळगाव कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 49 ए टी 7682 ने अमळनेर नाक्याकडून येत असलेल्या मोटरसायकल स्वाराना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस उभ्या असलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 19 बी के 0442 ला जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील बापू हरचंद भालेराव राहणार धरणगाव हा ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागी ठार झाला तर धनंजय विनायक साठे, कैलास युवराज पाटील, बाळू पंढरीनाथ पवार, शाहरुख मोहम्मद पठाण असे चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली यापूर्वी अमळनेर नाक्याजवळ अनेक वेळा अपघात झाले असून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून देखील कोणतीही उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे सहाय्यक निरीक्षक गणेश आहीरे पोलीस कर्मचाऱ्यांनी संताप्त नागरिकांना समजण्याच्या प्रयत्न केला मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.जो पर्यंत अंमळनेर नाका रस्ता क्रॉसिंग वर गतिरोधक बसवण्यात येत नाही,व सर्कल निर्माण करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी संपत भूमिका नागरिकांनी घेतली.

नागरिकांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस सुमारे तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते शहरातील राजकीय व सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्याने आंदोलनकरांना समजावण्याच्या प्रयत्न केला मात्र नागरिकांनी आंदोलन मागे घेण्यात नकार दिला.रात्री उशिरा संतप्त नागरिकांनी रस्ता क्रॉसिंग रस्ता क्रॉसिंग वर जेसीबीच्या साह्याने राष्ट्रीय महामार्ग खोदून काढला रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती. याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार