नागपूर :- दुचाकीवर बसण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीशी भर रस्त्यात अश्लील चाळे करून प्रियकराने तिचा विनयभंग केला. प्रेयरीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.संकेत मेश्राम (२५, मोहाडी. जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेची फेसबुकवरून संकेत मेश्रामशी ओळख झाली होती. दोघांचे सूत जुळले. त्यांच्यात भेटीगाठी वाढून ते फिरायलाही जाऊ लागले. १४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी संकेतने तिला भेटायला बोलावले. मात्र, तिने घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने आरोपी संकेतने तिला घरी जाऊन मारहाण केली होती. तेव्हापासून तिने संकेतशी बोलणे बंद केले. दोघांची बोलचाल नसली तरी ते मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते.२७ डिसेंबर २०२३ रोजी तो महिलेच्या घराजवळ आला.
त्याने प्रेयसीला बाहेर बोलावले आणि दुचाकीवर बसायला सांगितले. तिने गाडीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेला आरोपी संकेतने तिला मारहाण करून तिच्याशी रस्त्यावरच अश्लील चाळे केले. संकेतच्या तापट स्वभावाला कंटाळलेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संकेतविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






