Viral Video : आजकालची तरुणाई प्रसिद्धीसाठी काय करेल काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक मजेशीर, विचित्र, स्टंटचे व्हिडीओ करतात. आपला जीव धोक्यात घालून ते असे फोटो, व्हिडीओ बनवतात. तरुण तरुणींचे स्टंटबाजी करतानाचे तर बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशातच यात आणखी एका व्हिडीओची भर पडलीय. एक तरुणी भररात्री सायकलवक स्टंटबाजी करताना दिसली. जिव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना ही तरुणी दिसली.
या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होतोय.एका तरुणीनं प्रसिद्धीसाठी आपला जीव धोक्यात घातलाय. एका व्हिडीओसाठी तिनं जे काही केलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. तिच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी निर्जन रस्त्यावर सायकलवर स्टंट करत असल्याचं दिसत आहे. मुलीचा हा स्टंट खूपच धोकादायक आहे. सायकलच्या हँडलवर दोन्ही पाय ठेऊन ती स्टंट करताना दिसत आहे.
थोडासाही तोल गेला असतात तर तरुणीला गंभीर दुखापत झाली असती. सुदैवानं अपघात घडला नाही मात्र हा खूपच भयानक आणि धोकादायक स्टंट आहे. @dipti_patar143 नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर लोक कमेंट करत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.