रेणापूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना डिघोळ देशमुख (ता.रेणापूर) येथे शनिवारी (ता.६) रात्री उशिरा उघडकीस आली. वैभव ज्योतीराम निकम (वय ३४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव ज्योतीराम निकम हा टेंपोचालक असून तो पत्नी, मुलगा, मुलीसह गावात वास्तव्यास होता. कोणाला काही न सांगता तो दोन जानेवारीपासून घराबाहेर पडला होता.
प्रयत्न करूनही शोध लागत नसल्याने त्याचा भाऊ सूरज ज्योतीराम निकम यांनी पाच जानेवारीला रेणापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान सहा जानेवारीला डिगोळ देशमुख शिवारातील श्रीराम पवार यांच्या शेतालगत मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, जमादार एस. व्ही. शेंबाळे व त्यांचे सहकाऱ्यांनी पंचनामा केला.चाकूर – रेणापूर उपविभागाचे उपअधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तपासाच्या सूचना केल्या. वैभवचा भाऊ सूरज ज्योतीराम निकम यांनी शनिवारी (ता. ६) रात्री रेणापूर पोलिसांत फिर्याद दिली.’माझी भावजय आणि तिच्या प्रियकराला माझ्या भावाने एकत्र बघितले.
तो अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने भावजय व अल्पवयीन प्रियकराने मिळून भावाच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. नंतर दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला. शेतालगत मृतदेह फेकून दिला. रक्ताने माखलेली गोधडी घरामागे जाळून टाकली’ असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. जिलानी मानुल्ला तपास करीत आहेत.
पत्नीने दिली खूनाची कबुली…
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मयताची पत्नी नेहा वैभव निकम हिच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा मी व अल्पवयीन प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मयताची पत्नी आरोपी नेहा व तिच्या अल्पवयीन प्रियकरास ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.