Viral Video: नवरा-बायकोमध्ये वाद होणं, ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये वाद होत असतात. नवरा बायकोच्या वादामधील एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मात्र या वादातील ट्वीस्ट म्हणजे दोन बायका आणि नवऱ्याचा वाद सुरु आहे. नवऱ्याचं पितळ त्याच्या बायकांसमोर उघड झालं आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला उभे राहून दोन महिला आणि एका पुरुषामध्ये वादावादी सुरु आहे.
दोन महिलांमध्ये नवऱ्यावरुन वाद सुरु असतो. नवरा दोघींमधील वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असतो. तरी देखील दोघी ऐकण्याचे नाव घेत नाहीत. पती एका पत्नीला रिक्षामध्ये बसवण्याच्या प्रयत्न करत असतो. परंतु रिक्षामध्ये न बसता ती महिला पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत पुना वाद घालते. कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे.
शेवटी पती दोघींनाही शांत करुन रिक्षामध्ये बसवतो.सोशल मीडिया एक्स(twitter)वरील @gharkekalesh या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नक्की व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.