जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांचे कडून शहरातील विविध विकासकामांची पाहणी.

Spread the love

एरंडोल :- शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची जिल्हा
बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रमुख पदाधिका-यांसह पाहणी केली.शहरातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार
असल्याची माहिती त्यांनी दिली.शहरात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नवीन पाणी पुरवठा योजना,नवीन वसाहतींमध्ये गटार बांधकाम,सार्वजनिक उद्यानांचे सुशोभिकरण,रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरण,विपश्यना केंद्र बांधकाम,स्मशानभूमी बांधकाम यासह विविध विकासकामे सुरु असून जिल्हा
बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील आणि प्रमुख पदाधिका-यांनी सर्व ठिकाणी भेटी देवून कामांची पाहणी केली.

कामांच्या गुवात्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून सुरु असलेली विकासकामे त्वरित पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारास दिल्या.शहर आणि गांधीपुरा भागाला जोडणा-या सुमारे चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या अंजनी नदीवरील रंगारगल्ली ते गांधीपुरा पुलाची पाहणी
केली.गांधीपुरा ते एरंडोल शहर यांना जोडणा-या पुलास मंजुरी मिळवण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.पुलामुळे दोन्ही भागातील नागरिक व विद्यार्थी यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.पावसाळ्यात गांधीपुरा भागातील नागरिकांना गावात येण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर अंतर फिरून यावे लागत होते.

तसेच अंजनी नदीच्या पात्रात पाणी असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जातांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील खुल्या भूखंडांवर सार्वजनिक उद्यानांची निर्मिती करण्यात येत असून त्यांचे सुशोभिकरण देखील करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पहिलाच उपक्रम असलेल्या आणि पालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ‘पुस्तकांचा बगीचा’स भेट देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले.

पुस्तकांच्या बागीचामुळे वाचन संस्कृतीत वाढ होऊन विद्यार्थी, महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.शहरात पूर्ण झालेल्या विकासकामांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,कुणाल पाटील, प्रवाराज पाटील,आदित्य पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार