बापलेकाच्या नात्याला काळीमा! दारूसाठी तीन वर्षांच्या बाळाची अडीच लाखांत विक्री; मित्रांसोबत केली पार्टी

Spread the love

यवतमाळ :- तीन वर्षीय बाळाची अडीच लाखांत विक्री केल्याची व त्याच पैशात दारू पार्टी केली माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर ठाणेदार केशव ठाकरे यांनी चौदा तासांच्या तपासात पाच आरोपींना शुक्रवारीच (ता.पाच) अटक केली. एका पसार आरोपीच्या मागावर पोलिस आहेत.दरम्यान पोलिसांनी बाल न्याय मंडळ यवतमाळ येथे ह्या बाळाला सुखरूपपणे आई पुष्पा देवकर यांच्या ताब्यात दिले.

तालुक्यातील कोपरा येथील पुष्पा श्रावण देवकर (वय२७) ही तिचा दारुडा पती श्रावण देवकर याच्या त्रासाला कंटाळून तीन वर्षाचे बाळ नवऱ्याकडे ठेवून देवळी (ता. वर्धा) येथे मोठया बहिणीकडे एका महिन्यापूर्वी गेली होती. बहिणीकडे पुष्पाला माहिती मिळाली की, तिच्या बाळाची तिच्या नवऱ्याने परराज्यात विक्री केली. त्यावरून तिने गुरुवारी (ता.चार) आर्णी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित महिलेचा पती श्रावण देवकर, त्याचे साथीदार चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडंबे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

तेलंगणातून अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव बोल्ली गंगाराजू गंगाराम (वय ४५, रा. मोहनराव पेठ, ता. कोर्टुला, जि. जगतीयाल) असे आहे. या शिवाय या प्रकरणात मुलाच्या बापासह पाच आरोपी अटक आहेत. ही कारवाई ठाणेदार केशव ठाकरे, जमादार मनोज चव्हाण, आकाश गावंडे, जया काळे यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

रातोरात बाळ आर्णीकडे

आदिलाबाद येथे अडीच लाखांत मुलाची विक्री केल्याचे कळले. आदिलाबाद येथील एजंट अरविंद उस्केमवार याला ताब्यात घेऊन बाळासंबंधित चौकशी केली असता ते बाळ तेलंगणा राज्यात एका महिलेकडे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे संबंधित महिलेला ताब्यात घेऊन बाळालाही आपल्याकडे घेतले आणि रातोरात पुन्हा आर्णीकडे निघाले.

हे पण वाचा

टीम झुंजार