एरंडोल :- वाळूची चोरट्या व अवैध मार्गाने होणारी वाळू वाहतूक रोखणा-याप्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महसूलकर्मचा-यांवर उत्राण येथील गिरणा नदीच्या पात्रात वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळूमाफियांच्या गुंडांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना मारहाणकरून खाली पाडले आणि त्यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. महसूलकर्मचा-यांनी वाळूमाफियांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून प्रांताधिकारी गायकवाड यांची सुटका करून वाचवले.वाळूमाफियांनी महसूल पथकावर दगडफेककरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांच्या मारहाणीत प्रांताधिकारी गायकवाड यांचेसह महसूल पथकातील काही कर्मचा-यांना मारहाणकरून त्यांचे कपडे फाडण्यात आले.
याबाबत दहा ते पंधरा संशायीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाळूमाफियांनी दगडफेक करून कर्मचा-यांनीताब्यात घेतलेले ट्रॅक्टर कर्मचा-यांवर दगडफेक करून पळवून नेले.दरम्यानकाही दिवसांपूर्वी विखरण येथे देखील सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर जमावानेहल्ला करून पोलीस वाहनाची तोडफोड केल्यामुळे तालुक्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांनी सकाळी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड जखमी महसूलकर्मचा-यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.महसूल पथकावरहल्ला करणा-या गुंडांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

दरम्यानवाळू उपशावर बंदी असतांना वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआमपणे वाहतूककरणा-या वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयपरिसरात बिनधास्तपणे फिरणा-या वाळूमाफियांच्या दलालांविरुद्ध देखील कारवाई करण्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.याबाबत माहिती अशी,की काल (ता.१२) रात्री प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचेसह भालगावचे मंडळाधिकारी दीपक ठोंबरे,तलाठी शकील अहमदशेख,विश्वंभर शिरसाठ, उत्राणचे मंडळाधिकारी प्रमोद गायधनी,उत्राणअहिरहद्दचे पोलीसपाटील प्रदीप तिवारी,उत्राण गुजरहद्दचे पोलीस पाटील राहुल महाजन,आडगावचे कोतवाल अमोल पाटील खाजगी वाहनाने वाळूचोरी रोखण्यासाठीउत्राण रस्त्यावरील दर्ग्याजवळ असलेल्या गिरणानदीच्या पात्रात गेले होते.
नदीपात्राची पाहणी करीत असतांना प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड वत्यांच्या सहका-यांना सुमारे आठ ते दहा ट्रॅक्टर पात्रातून वाळूचा उपसाकरून भरत असल्याचे दिसून आले.महसूल पथकातील कर्मचारी ट्रॅक्टर कडे जातअसतांना सात ते आठ ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर परधाडे गावाच्या दिशेनेपळवून नेले तर दोन ट्रॅक्टर पथकाने पकडले.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व पथकातील कर्मचारी ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर जवळ उभे असतांना चार ते पाचयुवक त्याठिकाणी आले आणि कर्मचा-यांशी वाड घालून हुज्जत घालूलागले. ट्रॅक्टरपुढे नेल्यास हातपाय तोडू अशी धमकी कर्मचा-यांना युवकांनीदिली.

प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी आम्ही महसूल कर्मचारी असूनतुम्ही वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करीत असल्यामुळे ते जप्त करणार असल्याचे सांगितले.त्यावेळी युवकांनी अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर यांनाआरोळ्या मारून ट्रॅक्टर जवळ बोलावले. त्यावेळी सुमारे पंधरा ते वीस युवकत्याठिकाणी आले आणि त्यांनी प्रांताधिका-यांसह पथकातील कर्मचा-यांनाशिवीगाळ करून मारहाण करू लागले. वाळूमाफियांच्या गुंडांनी केलेल्यामारहाणीत कर्मचा-यांचे कपडे फाटून त्यांना मार लागला.त्याचवेळी काही युवकांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांच्याछातीवर बसून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.प्रांताधिकारी गायकवाड यांना सात ते आठ युवक मारहाण करून गळा दाबत असल्याचे पाहून पथकातील कर्मचा-यांनी जमावाच्या ताब्यातून स्वत:ची सुटकाकरून प्रांताधिकारी गायकवाड यांची सुटका करून वाचवले.
त्यानंतर वाळूमाफियांच्या गुंडांनी पथकावर दगडफेक करून दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले.वाळूमाफियांनी दगडफेक करण्यास सुरुवात केल्यामुळे पथकातील कर्मचारीस्वत:चा जीव वाचवण्यासाठी आडोशाला लपण्याचा प्रयत्न करीत होते.वाळूमाफियांच्या मारहाणीत प्रांताधिकारी व पथकातील कर्मचारी जखमीझाले आहेत.त्यानंतर उत्राण अहिर हद्द्चे पोलिसपाटील प्रदीप तिवारी यांनी हल्लेखोरांपैकी एकास ओळखून त्याचे नाव आकाश राजेंद्र पाटील असल्याचे सांगितले.याबाबत मंडळाधिकारी प्रमोद गायधनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासोदा पोलीसस्थानकात सुमारे दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविधकलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोहन गुंजाळ तपासकरीत आहेत.
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचेसह महसूल कर्मचा-यांनामारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यांना पकडण्याचे आव्हानपोलिसांसमोर उभे राहिले आहे.यापूर्वी उत्राण येथील माजी सरपंचांच्यापतीने वाळू माफियांच्या गुंडगिरीला कंटाळून तहसीलदार कार्यालयासमोरअंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. वाळूमाफियांनी रात्रीच्यावेळेस ठिकठीकाणी काही युवकांना बसवून पथकातील सदस्यांची माहितीपुरवण्याची जबाबदारी सोपवलेली असते.विशिष्ठ सांकेतिक शब्दांचा वापर करूनमोबाईलच्या माध्यमातून वाळूमाफिया एकमेकांशी संपर्क करीत असतात.दरम्यानप्रांताधिका-यांसह कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माणकरण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून केला जात आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसादयांना घटनेची माहिती समजताच त्यांनी एरंडोल येथे भेट देवून प्रांताधिकारीव जखमी कर्मचा-यांनी भेट घेवून विचारपूस केली.
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.