बेगूसराय (बिहार) :- येथे रिल्स बनवण्यापासून रोखल्यानं पत्नीनं पतीची हत्या केल्याचं समोर आले. त्यात आता पोलिसांनी मृत महेश्वर रायची पत्नी राणी आणि तिच्या प्रियकरासह २ साथीदारांना अटक केली आहे.राणीनं पती महेश्वर रायच्या हत्या केल्याच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. महेश्वर आणि राणी यांचं ६-७ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर महेश्वर कामाच्या निमित्तानं कोलकाता इथं राहू लागला. तर सासरी राहणाऱ्या राणीचं एका युवकासोबत अफेअर सुरू झाले. हा प्रकार सासरच्यांना कळाल्यानंतर घरात वाद सुरू झाले.
त्यानंतर राणी तिच्या माहेरी राहू लागली. त्याठिकाणी ती इन्स्टाग्रामवर रिल्स बनवू लागली. इन्स्टावर रिल्स बनवल्यानं ती फेमस झाली आणि तीची मैत्री अन्य मुलांसोबत होऊ लागली. त्यानंतर राणी त्या मुलांसोबत चॅटिंग करत होती. या गोष्टीने राणीचा पती महेश्वर नाराज होता. त्यात महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या सासरी पोहचला. त्यानंतर रविवारी महेश्वरचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. महेश्वर सासरी गेल्यानंतर तिथे त्याचा पत्नीसोबत वाद झाल्याचे बोलले जाते. पत्नीचे रिल्स बनवणे आणि अन्य युवकांसोबत चॅटिंग करणे हे महेश्वरला आवडत नसे. त्यावरून दोघांचा वाद झाला. परंतु हा वाद महेश्वरच्या जीवावर बेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी राणीने तिचा प्रियकर आणि २ बहिणी रोजी कुमारी, सुनीता कुमारी यांच्यासोबत मिळून महेश्वरच्या हत्येचा कट रचला. पत्नीने महेश्वरला फोन करून घरी बोलावले त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. महेश्वरच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबाला तेव्हा कळाली जेव्हा कोलकाता इथं राहणारा त्याचा भाऊ रुदलने त्याच्या नंबरवर फोन केला मात्र तो फोन दुसऱ्याने उचलला.
संशय आल्यानंतर रुदलने कुटुंबाला माहिती देत महेश्वरच्या सासरी पाठवले तेव्हा महेश्वरचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत महेश्वरच्या कुटुंबाने यात सून राणीवर आरोप लावला आहे. पत्नी राणी कुमारी टिकटॉक आणि रिल्स बनवण्याचा विरोध केल्यावर पत्नी आणि सासरच्यांनी महेश्वरला मारून टाकले असा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी महेश्वरची पत्नी राणी, तिचा प्रियकर आणि २ बहिणींना ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






