VIDEO:धावत्या ट्रेनमध्येच चालता-फिरता नाईट क्लबची मज्जा! मस्त डीजेच्या तालावर नाचा अन् करा पार्टी; पहा व्हिडिओ

Spread the love

नवी दिल्ली:VIDEO: मित्रमैत्रिणींना भेटून त्यांच्याबरोबर पार्टी करायची असेल तर सहसा कुणीही क्लब किंवा पबमध्ये जाऊ शकतं. तिथल्या लाउड म्युझिकमध्ये नाचत, खात-पित मजा करणं अशी पार्टीची खरं तर अलिखित व्याख्या! अशी पार्टी सहसा नीट ठरवूनच केली जाते. पण तुम्ही प्रवासाला जाल आणि प्रवासच पार्टी ठरेल अशा एका ट्रेनबद्दल तुम्हाला माहितीये का? आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत. या ट्रेनमधल्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय.ही ट्रेन जर्मनीतल्या नूर्नबर्ग शहरातून धावते. संध्याकाळी धावणारी ही टेक्नोट्रेन सात तासांच्या प्रवासात प्रवाशांना नाईट क्लबचा अनुभव देते.

त्यामुळे या ट्रेनच्या प्रवासानंतर प्रवासाचा शीण येतो अशी तक्रार करायची संधी बहुधा प्रवाशांना मिळणार नाही. हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हालाही एक वेगळाच अनुभव येईल. या ट्रेनमध्ये बसायला सीट आहेत. पण माहौल मात्र पूर्णपणे नाईट क्लबची आठवण करुन देणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना ही ट्रेन आहे की नाईट क्लब? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.जर्मनीतलं नूनबर्ग हे शहर तिथल्या संस्कृती आणि समृद्ध इतिहासासाठी ओळखलं जातं. प्रवाशांना ही ट्रेन जर्मनीतल्या ग्रामीण भागाचं देखणं दर्शन घडवते आणि सकाळी म्यूनिक इथे पोहोचते. सात तासांच्या या प्रवासाचं तिकिट आणि त्या बदल्यात नाईट क्लब आणि जर्मनीची सुंदर सफर असा अनुभव म्हणजे हा प्रवास संस्मरणीयच म्हणायला हवा. सध्या इन्स्ट्राग्रामवर ही ट्रेन खूप चर्चेत आहे.

लाईक अ लीफ नावाच्या हॅंडलवरुन या ट्रेन प्रवासाचा व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला आणि त्यानंतर आतापर्यंत तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. 68 लाखांहून जास्त लोकांचा तो बघून झालाय. त्यातल्या 4 लाख लोकांनी तो लाईक केलाय. लाईक करुन कमेंट करणाऱ्यांनी हा व्हिडिओ अत्यंत भन्नाट असल्याचं म्हटलंय. ट्रेनचा प्रवास हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो. इतर प्रवासाच्या पर्यायांपेक्षा ट्रेनच्या प्रवासाचा शीणही कमी येतो. विमान प्रवासात एकदा विमानाने उड्डाण केलं की जगापासून तुटलेपण येतं. तसं ट्रेनच्या प्रवासात होत नाही.

उलट निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी मिळते. सहप्रवाशांशी संवादही ट्रेनमधून जाताना जास्त चांगला होतो. ट्रेनवरच्या प्रेमासाठी इतर प्रवासाचे पर्याय असतानाही ट्रेनने ये-जा करणारे कित्येक लोक आपल्या आजूबाजूला असतात. ट्रेनचा प्रवास असा नाईट क्लबचा अनुभवही देणार असेल तर पार्टीप्रेमी लोकांची पावलंही इकडे वळतील हे नक्की. तुम्ही बघितला की नाही हा व्हिडिओ?

https://www.instagram.com/reel/CzI3dGMtRRd/?igsh=MXZtajQyZHh3Y3FmNA==

हे पण वाचा

टीम झुंजार