येणारा आठवडा कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
या सप्ताहात सूर्य, हर्षल लाभयोग, शुक्र, शनि युती होत आहे. तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. नातलगांची भेट होईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही सावधपणे लोकांच्या व नेत्यांच्यावर विश्वास ठेवा. कदाचित तुम्हाला विचार बदलावा लागेल. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना विचार करा. भाळून जाऊ नका. संसारात मुले आनंद देतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधनात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून बोला. कोणत्याही परीक्षेसाठी कसून अभ्यास करा. भ्रमात राहू नका. प्रेमात वाहवत जाऊ नका. शुभ दि. १४, १८
वृषभ:
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. उधारी वसूल करा. पाहुणे आल्याने खर्च वाढेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. घरच्यांची मर्जी राखा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कायम ठेवता येईल. कोणत्या व्यक्तीशी वाद वाढवायचा याचे भान ठेवा. नोकरीत क्षुल्लक व्याप वाढेल. फसगत टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात काम मिळेल, परंतु पैसे देऊन तुमचे कोणतेही काम होईल यावर विश्वास ठेवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. तुमच्याशी मैत्री करणारे लोकच स्पर्धा करतील. परीक्षेसाठी चांगली तयारी करा. वाकड्या वाटेने जाऊ नका. शुभ दि. १५, १९
मिथुन:
या सप्ताहात सूर्य, हर्षल लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. रेंगाळत राहिलेले कोणतेही काम करून घ्या. धंद्यात सुधारणा करता येईल. गैरसमज दूर करू शकाल. वेगाने कार्य करा. धंद्यातील चूक सुधारून मोठा निर्णय घेता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यातील त्रुटी समजून घ्या. प्रगतीचा वेग वाढवता येईल. तुमच्याबद्दलचा संशय दूर करू शकाल. घरात शुभ समाचार मिळेल. मैत्री वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. संशोधनाच्या कामाला वेग प्राप्त येईल. वरिष्ठांना खूश कराल. परीक्षेसाठी उत्तम तयारी करा, तरच यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. शुभ दि. १६, २०
कर्क:
या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र, शनि युती होत आहे. चहाच्या पेल्यातील वाद चहापुरतेच राहील, त्यानंतर कामे होतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. धंद्यात वाढ करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात भलत्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जवळची माणसेसुद्धा विश्वासघात करू शकतात. धंद्यात पैसे गुंतवणे धोक्याचे ठरू शकते. संसारात मतभेद होतील. वाटाघाटीत तुमचे मत विचारात घेतले जाईल. दादागिरीची भाषा उपयोगी पडणार नाही. शांततेने प्रश्न मार्गी लावा. नोकरीत काम समाधानकारक होईल. संशोधनात तुम्ही सावध रहा. राग वाढू देऊ नका. वाहन जपून चालवा. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. सकस आहार घ्यावा. शुभ दि. १४, १७

सिंह:
या सप्ताहात बुध, नेपच्यून युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही ठरविलेल्या कामात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. दगदग वाढेल. वादाला जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तणावातून मार्ग शोधता येईल. चर्चा सफल होईल. संसारातील वाद कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. संयम बाळगा. धंद्यात लक्ष देऊन वाढ करा. आप्तेष्ठांच्या मदतीला जावे लागेल. नोकरीत वर्चस्व राहील. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा प्रगतीची संधी मिळेल. संशोधन चांगले होईल. वरिष्ठ खूश होतील. कोर्ट केसमध्ये आशादायक वातावरण राहील. परीक्षेसाठी मन लावून अभ्यास करा. भ्रमात राहू नका. शुभ दि. १५,१८
कन्या:
या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. राहून गेलेली कामे करून घ्या. सामाजिक कार्याची चर्चा करता येईल. धंद्यात वाढ होईल. राजकारणात इतरांना मदत करताना तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. त्याची सावधगिरी बाळगा. सामाजिक कार्यात लोक तुमची मदत मागण्यास येतील. आर्थिक व्यवहार करताना उतावळेपणा नको. धंद्यात खोटा मोह टाळा. तुमची प्रतिष्ठा घालवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होईल. वाहन जपून चालवा. संशोधनाच्या कामात दिशाभूल केली जाईल. विद्यार्थी वर्गाने चांगले संस्कार विसरू नये. शुभ दि. १६, १९
तूळ:
या सप्ताहात सूर्य, हर्षल लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. जुने स्नेही भेटतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात तुमचा नावलौकिक वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठे काम सोपवण्यात येईल. लोकप्रियता वाढेल. धंद्यात फायदा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्समध्ये लाभ होईल. दर्जेदार लोकांचा सहवास कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल. मोठे काम तुमच्याकडून होईल. नोकरी लागेल. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. कोर्ट केस यशस्वी करता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी मित्रांची मदत घेऊन अभ्यास करावा. मोठी प्रगती करावी. शुभ दि. १७, २०
वृश्चिक:
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. घरात क्षुल्लक अडचण येईल. रागावर ताबा ठेवा. तुमचे सामाजिक काम सुरळीत होईल. मन स्थिर होईल. धंदा वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचे काम करून घेता येईल. भेट यशस्वी होईल. तुमच्या पद्धतीने लोकांना मुद्दे पटवून देता येतील. धंद्यात लक्ष द्या. किरकोळ मतभेद होतील. संसारात सुखद घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांच्याकडून आश्वासन मिळेल. कल्पनाशक्तीचा उपयोग करून घेता येईल. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाने घेतलेले परिश्रम उपयोगी पडतील. परदेशात जाण्याचा योग येईल. अविवाहितांना स्थळे मिळतील. शुभ दि. १४, १६

धनु:
या सप्ताहात शुक्र, नेपच्यून लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. संमिश्र स्वरूपाचे प्रसंग घडतील. क्षुल्लक अडचणी प्रवासात येतील. वाहन हळू चालवा. धंद्यात नाराजी होऊ शकते. मार्ग शोधता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात धावपळ करावी लागेल. प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योजना मार्गी लावता येईल. जास्त प्रयत्न करा. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. फसवणूक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. प्रसिद्धी मिळेल. क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधन कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जुने स्नेही भेटतील. विद्यार्थी वर्गाने आळस न करता मोठ्या परीक्षेची तयारी नियमितपणे करावी. शुभ दि. १५, १७
मकर:
या सप्ताहात सूर्य, हर्षल लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. घरगुती समस्यांमधून मार्ग निघेल. जवळच्या व्यक्तीला नाराज करू नका. जेवणानंतर तुमचे मन आनंदी होईल. धंद्यात चांगली संधी समोरून येईल. त्याचा विचार करा. समस्येतून बाहेर पडता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला जम बसवता येईल. दिलेले शब्द कायमस्वरूपी पाळल्यास लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. प्रयत्न करा. संसारात किरकोळ अडचणी येतील. वाटाघाटीत गैरसमज होऊ शकतो. नोकरीत कायद्याचे पालन करा. मैत्रीमध्ये तणाव संभवतो. विरुद्धलिंगी व्यक्तींकडून मनस्ताप होईल. संशोधन कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. खाण्याची काळजी घ्यावी. शुभ दि. १६, १८
कुंभ:
या सप्ताहात शुक्र, नेपच्यून लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. तुम्ही ठरविलेल्या कामात बदल करावा लागेल. शेजार्याला मदत करण्यात वेळ जाईल. नको असलेले काम करावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. काही लोकांना तुमची मते फारच धाडसी वाटतील. त्याला लोक विरोध करण्याची शक्यता आहे. गुप्त कारवाया होतील. कठीण प्रसंगावर मात करता येईल. संयम ठेवा. धंद्यात फायदा होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. घरगुती समस्या सोडवण्यात वेळ जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात आळस नको. मोठे यश मिळवता येईल. नोकरी लागेल. संशोधनात धावपळ होईल. यश खेचता येईल. शुभ दि. १७,१९
मीन:
या सप्ताहात सूर्य, चंद्र, प्रतियुती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात तणाव होऊ शकतो. वेळ पडल्यास तडजोड करण्याची वेळ येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्या योजनांच्यावर टीका होईल. नोकरीत कामामध्ये चूक होऊ शकते. धंद्यात हिशोब नीट करा. बोलताना ताळमेळ सोडू नका. महत्त्वाची वस्तू सांभाळा. सर्व ठिकाणी विचारपूर्वक वागा. घरातील व्यक्तींचा सल्ला घ्या. खरेदी-व्रिकीत नुकसान होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. संशोधनाच्या कामात मेहनत जास्त होईल. तडजोड करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे बोलावे. अभ्यासात काटकसर करू नये. मोठे यश मिळेल. शुभ दि. १८, २०
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.