जळगाव :- मैत्री करण्याच्या बहाण्याने प्लॅट वर बोलावून महिलेने वाहन चालक असलेल्या व्यक्तीला मोबाईल वरून संपर्क करत बोलावून घेतले… महिलेच्या गोड आवाजाच्या जाळ्यात तो फसला हे त्याला प्लॅटवर पोहचल्यावर समजले पण त्या ठिकाणी आधीच हजर असलेल्या दोन साथीदारांनी त्याला मारहाण केली आणि महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडून सेक्स करतांना व्हिडीओ तयार केला. दरम्यान त्या व्यक्तीकडून रोख रक्कम, दागिने व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅट मधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. पलीकडून बोलणा-या महिलेच्या आवाजाला भुलला आणि चालक प्लॅट वर पोहचला तो वाहनचालक मनातून खुश झाला आणि त्या इमारतीत त्या महिलेला भेटण्यास गेला.त्या ठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करत त्या महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडले.

या बळजबरी समागमाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. त्याच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज काढून घेण्यात आला. तयार करण्यात आलेला व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत त्याला अजून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती वसुल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






