साहिबाबाद (उत्तर प्रदेश) :- मधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीसहीत सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेचा आरोप आहे की, लग्नानंतर ती आणि तिचा पती हनीमूनला गेले होते.ज्यासाठी साधारण 10 लाख रूपये खर्च झाले होते. आता पती तिच्याकडे हनीमूनसाठी खर्च झालेले पैसे परत मागत आहे. इतकंच नाही तर महिलेने सांगितलं की, पतीने तिला माहेरून पैसे आणण्यासही सांगितलं.पीडितेचा आरोप आहे की, माहेरून पैसे आणले नाही म्हणून सासरी तिला त्रास दिला जात आहे.
पतीने तिची थंड पाण्याने आंघोळ घातली. इतकंच नाही तर फ्रीजरमधील बर्फही तिच्या अंगावर टाकला. महिलेने पतीसहीत सासरच्या लोकांवर गर्भपात करण्याचा आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे.पीडितेने आपल्या पतीसहीत एकूण 5 लोकांवर आरोप करत पोलिसात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. असं सांगण्यात आलं की, डिसेंबर 2022 मध्ये महिलेचं लग्न झालं होतं. लग्नात साधारण 60 लाख रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा महिलेने केला. पीडितेने सांगितलं की, तिचं लग्न 2022 ला रोहित नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं.

लग्नानंतर दोघे हनीमूनला गेले. जिथे साधारण 10 लाख रूपये खर्च झाले. हनीमूनवरून परत आल्यावर पतीने तिला खर्च झालेले पैसे परत मागितले. नकार दिला तर पतीसहीत सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. महिलेचा आरोप आहे की, तिचा गर्भपातही करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.