चोपडा :- जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारा अत्याचारा प्रकार समोर आला आहे चोपडा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीवर आधी एकाने व नंतर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित चार नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे.तालुक्यातील एका गावात गफूर गबू तडवी (३३) याने २ जानेवारी रोजी दुपारी तरुणीच्या घरात घुसून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये; नाहीतर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतीक राजेंद्र कोळी (२०), पंकज बुधा कुंभार (२६) व अमोल शत्रुघ्न कोळी (२३) या तीन जणांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली.नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला.
४ जानेवारी रोजी रात्री १२ ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकारानंतर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.