Viral Video: चोरी करणं तस धाडसाचं काम. समोरच्याला धमकावून, हातचलाखी करत अगदी सफाईदारपणे चोरी केल्याच्या अनेक घटना तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील. अनेक धाडसी चोरीच्याही घटना तुमच्या आजुबाजूला घडल्या असतील.पण सगळेच चोर असे नसतात. चोरांनाही भिती असते. अनेकदा परिस्थितीमुळेही त्यांना हा मार्ग अवलंबवा लागतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया…
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील एका मंदिरातून मूर्ती चोरीला गेली. मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ हे बालमुखी मातेचे मंदिर आहे. आचार्य प्रदीप गोस्वामी त्याची काळजी घेतात. शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी येथे पोहोचले असता, दुर्गादेवीची अष्टधातूची मूर्ती न मिळाल्याने ते चक्रावून गेले.

यानंतर त्यांनी मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV Footage) तपासले असता मुर्तीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या व्हिडिओमध्ये चोराने केलेल्या कृतीने सर्वजण चकित झालेत. चोराची ही कृती पाहणाऱ्यांसाठी अगदी अनपेक्षित होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

चोराने केली अशी कृती…
एक तरुण मंदिरात येतो. त्यावेळी निळ्या रंगाचं जर्किंग घातलेलं असतं. तर डोक्यावर काळी टोपी होती. मंदिरात आल्यावर तो आजूबाजूला पाहतो. मग तो हात जोडतो, कान धरतो आणि त्यानंतर मंदिरातील मुर्ती चोरुन पसार होतो. चोराची ही कृती पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.