पुणे :- कट्यारीने वार केला. त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे. नवरदेवाने किरकोळ वादातून विवाह समारंभात मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला. त्यामुळे नवरदेवावर विवाहाच्या दिवशीच गुन्हा दाखल झालाय. करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी नवरदेव अभिजीत मिरगणे याच्यासह राहुल सरोदे आणि इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार 6 जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मंगल कार्यालयातच घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता.

नेमकं काय घडलं?
विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.यावेळी नवरदेव असलेल्या अभिजीतने सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर कट्यारीने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी तातडीने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.