Viral Video:दोन महिला दुचाकीने जातांना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानेआधीआपटली.. मग उडाली; विचित्र अपघाताच्या सीसीटीव्ही व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन चालवता गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने थेट महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर जाऊन आधळल्या आहेत.काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत दिसते की,एका रस्त्यावरुन एक महिला चालताना दिसत. व्हिडिओत दिसणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दीही नाही.

रस्त्याच्या एका बाजूला जंगलाचा परिसर दिसतोय. दरम्यान काही वेळानंतर स्कूटीवरुन येणाऱ्या दोन महिला सरळ रस्त्यात्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भिंतीवर स्कूटी सकट जाऊन आधळतात. ही धडक इतकी भयंकर होती की स्कूटीच्या पाठच्या सीटवर बसलेली महिला चक्क भिंतीच्या पलीकडे जाऊन पडते तर चालक महिला थोडक्यात वाचते. चालक महिलेने डोक्यात हेल्मेट घातले असल्याने तिच्या डोक्याला दुखापत होत नाही.व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील @RoadsOfMumbai या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,एक मोड़ आया..मैं उठे पिल्लिओं राइडर छोड़ आया..’सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकला नाही.मात्र सर्व घटना रस्त्याच्या जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या नेटकरी वर्गात या व्हिडिओचीच चर्चा होतेय. व्हिडिओवर यूजर्संच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,’निसर्गाचा आनंद घेण्याचा मार्ग अगदी अनौपचारिक आहे’ तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,स्वर्गाकडे जाण्याचा सरळ मार्ग आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाल्या आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार