चारित्र्यावर संशय घेतल्याने अमळनेर तालुक्यातील ३१ वर्षीय विवाहितेने जाळून घेतले , उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

चार जणांविरुद्ध मारवड पोलिसांत विविध पांच कलमान्वये गुन्हा दाखल

प्रतिनिधी | अमळनेर

येथून जवळच असलेल्या मांडळ येथील ३१ वर्षीय विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेला सहन न झाल्याने आज दिनांक १७ रोजी दुपारी १ वाजता काहीतरी ज्वालनशील पदार्थ अंगावर टाकून घेत स्वतःला जाळून घेत असता शेजारच्या लोकांनी पीडित विवाहितेला लागलीच धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ,याबाबत पीडितेच्या भावाने फिर्याद दिल्यावरून चार जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,

दत्तात्रय महादू पाटील ,चंद्रभागा दत्तात्रय पाटील ,विठोबा दत्तात्रय पाटील ,कीर्ती विठोबा पाटील सर्व राहणार मांडळ ता अमळनेर यांनी ३१ वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत चापटा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पीडित विवाहितेने स्वतःला ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जाळून घेतले , त्यात शेजारच्या लोकांनी तशा अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला ,

त्यापूर्वी मृत्यूपूर्वी घेतलेल्या जबाबा वरून कथन केले म्हणून विवाहित महिलेच्या भाऊ हितेंद्र वाल्मिक निकम राहणार अनचलगाव ता भडगाव यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात वरील चारही जनांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२३ ,३०६ ,५०४.५०६,३४ प्रमाणेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार