एरंडोल :- पत्रकार सर्वसामान्य नागरीकांच्याच्या समस्यांना वाचा फोडूनसमाजाला आरसा दाखवण्याचे काम करीत असतात असे प्रतिपादन मराठा महासंघाचेजिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी केले.छत्रपतीक्रीडा प्रसारक मंडळ व व्यायामशाळा आणि प्रा.मनोजभाऊ मित्र परिवारयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्यासत्कारप्रसंगी ते बोलत होते.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी अध्यक्षस्थानी होते.ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव, उदय पाठक,कमरअली सय्यद प्रमुख पाहुणे होते.
यावेळी शहरातील पत्रकारांचापत्रकारदिनानिमित्त सत्कार करण्यात आला.राजमाता जिजाऊ, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचेमान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.मनोज पाटील यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्यापत्रकारांनी समाजात जनजागृती करण्याचे काम करावे असे आवाहन केले. माझ्याराजकीय, सामाजिक,शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील यशात पत्रकारांचा मोठासहभाग असल्याचे सांगितले.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांनी पत्रकारांना सदैव जागृत राहून काम करावे लागत असल्याचे सांगितले.

पत्रकारिता करीत असतांना अनेक चांगल्या व वाईट प्रसंगांनासामोरे जावे लागत असून युवा पत्रकारांनी स्पर्धेत टिकण्यासाठी शोधपत्रकारिता करावी असे आवाहन केले.ज्येष्ठ संपादक प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी वर्तमानपत्र चालवणे म्हणजे काटेरी मुक्त असल्याचे सांगितले.पत्रकारांनी समाजाचा तिसरा डोळा म्हणून काम करावे असे आवाहनकेले.यावेळी जावेद मुजावर यांचेसह पत्रकारांनी मनोगत व्यक्तकेले.पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल पत्रकारांच्यावतीने प्रा.मनोज पाटीलयांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.
गुरु हनुमान व्यायामशाळेचे अध्यक्षभानुदास आरखे यांनी प्रास्ताविक करून सुत्रसंचलन केले.प्रा.मयूर जाधवयांनी आभार मानले.कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजयचौधरी,कैलास महाजन,प्रकाश शिरोडे,पंकज महाजन,नितीन पाटील ,राजधर महाजन, संदीप बोढरे,उमेश महाजन,कुंदनसिंग परदेशी यांचेसह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अनिल मराठे, लोकेश बाविस्कर,सागर गोसावी,मुन्नापाटील,भय्या लोहार,बापू मराठे,चेतन मराठे,भूषण चौधरी,मयूर मराठे,दिलीपसोनवणे,अनिल भोई,चंद्रकांत वाघ, ऋषिकेश पाटील यांचेसह पदाधिका-यांनीसहकार्य केले.