एरंडोल प्रांतधिकारी व महसुलअधिकारी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तिघांना स्थागु शाखेच्या पथकाने केले जेरबंद.

Spread the love

एरंडोल :- उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या पथकाच्या अंगावर वाळूचा ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे.आकश राजेंद्र पाटील, अमोल अरुण चौधरी, दादाभाऊ महादु गाडेकर (सर्व रा.पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

एरंडोल उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड (प्रांत) महसुल मंडळ अधिकारी उत्राण प्रमोद गायधनी हे त्यांच्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याकामी गिरणा नदी पात्रात गेले होते. त्यावेळी वाळूने भरलेला ट्रक पथकाच्या अंगावर घालून व प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटने प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ.सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, विजय पाटील, रणजीत पाटील, महिला हे.कॉ. अश्वीनी सावकारे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील तिघांना कासोदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार