बस्ती (उत्तर प्रदेश) :- जिल्ह्यातील गौर पोलीस ठाणे क्षेत्रातील छितही गावात झालेल्या एका ७५ वर्षीय वृद्धाच्या हत्येच्या गुन्ह्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी या वृद्धाची हत्या. त्याच्याच सूनेने केल्याची माहिती दिली आहे. वृद्ध आणि आजारी सासऱ्याची सेवा करावी लागल असल्याने वैतागून सुनेने लाकडाने गळा आवळून सासऱ्याची हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने सासऱ्याच्या मृतदेहावर चादर ओढून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा बनाव रचला.
पोलिसांनीही सुरुवातीला या अज्ञात खुन्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तपासाला गती मिळताच हे कृत्य घरातीलच कुणीतरी केलं, असावं अशी शंका आली. त्यानुसार पोलिसांनी मृताच्य कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्यानंतर सुनेने केलेल्या धक्कादायक कृत्याचा उलगडा झाला.एसपी गोपाल चौधरी यांनी सांगितले की, १५ जानेवारी रोजी ७५ वर्षीय रामकुमार यादव यांच्या झालेल्या हत्येतील आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे.

कसून चौकशी केल्यावर आरोपी सुनेने गुन्हा कबूल केला आहे. सासऱ्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांची सेवा करावी लागत होती. ते नेहमी घालूनपाडून बोलायचे. त्यामुळे रागाच्या भरात त्यांची हत्या केली. त्यांची हत्या केल्यानंतर हत्येसाठी वापरलेलं लाकूड जाळून टाकलं. आता आरोपी सुनेविरोधात कमल ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.