पारोळा :- म्हसवे शिवारात (ता. पारोळा) येथे तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर दोन चारचाकी (ओमनी) जळून खाक झाला. पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हसवे शिवारात शुक्रवारी (ता.१९) रात्री साडेनऊला दोन ओमनींमध्ये अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या स्टेशनवर गॅस भरण्यासाठी आल्या होत्या. गाडींमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला.
यात दुकानात असलेले तीन ते चार सिलिंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या. हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दूरवर पोचला. त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली.

आग विझल्यानंतर अग्निशमन दलाने याठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ गॅस सिलिंडर ताब्यात घेतले. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरीत्या गॅस कोण भरत होते. ही वाहने कोणाची होती. हे मात्र समजले नाही.यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. म्हसवे शिवारात असलेला हा गॅसचा अवैध केंद्र तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.