श्रीक्षेत्र रामेश्वर दुर्घटनेतील तीनही युवकांच्या वारसांना शासकीय मदतीचे धनादेश आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते वाटप.

Spread the love

एरंडोल :- श्रीक्षेत्र रामेश्वर येथे नदीच्या पात्रात बुडून मरण पावलेल्या तीनही युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुक्यातील दोन आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे वारस तसेच तीन शेतक-यांचे पशुधन वीज पडून मरण पावल्यामुळे त्यांच्या मालकांना नवीन पशुधन विकत घेण्यासाठी देण्यात आलेल्या शासकीय मदतीच्या धनादेशाचेही यावेळी वाटप करण्यात आले. धनादेश स्विकारतांना तीनही युवकांचे वारस तसेच आत्महत्या केलेले शेतक-यांचे वारस भावनाविवश झाले होते.

तहसीलदार कार्यालयात धनादेशाचे वाटप करण्यात आले. शहरातील सुमारे दोनशे ते तीनशे भाविकांनी श्रावण मासानिमित्त २१आगस्त रोजी एरंडोल ते श्रीक्षेत्र रामेश्वरधाम पायी कावड यात्रेचे आयोजन केले होते. कावडयात्रेतील भाविक श्रीक्षेत्र रामेश्वरधाम येथे पोहोचले.भाविकांनी नदीच्या पात्रात स्नान केले. त्याचवेळी भगवाचौक परिसरातील रहिवासी असलेले अक्षय प्रवीण शिंपी,सागर अनिल शिंपी आणि पियुष रवींद्र शिंपी या एकाच परिवारातील तीन युवकांचा नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला होता. शहरातील तीन युवकांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समजताच आमदार चिमणराव पाटील यांचे विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मदतकार्य केले होते.

२२ ऑगस्ट रोजी तीनही युवकांवर शोकाकुल वातावरणातअंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत करण्याचे जाहीर केलेहोते.आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून सहाय्यता निधी त्वरित मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. काल(ता.१९) तहसीलदार कार्यालयात मृतांचे वारस जयश्री अनिल शिंपी,ज्योती रवींद्र शिंपी,सुनिता प्रवीण शिंपी यांना पाच लाख रुपये मदतीचे धनादेशाचे आमदार चिमणराव पाटील यांचेहस्ते वाटप करण्यात आले.

मदतीचे धनादेश स्विकारतांना तीनही युवकांच्या आई भावनाविवश झाल्या होत्या.यावेळी विखरण येथील भाईदास दयाराम कोळी आणि निपाने येथील मच्छिंद्र भिवसन पाटील या दोन शेतक-यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आडगाव येथील संतोष प्रल्हाद महाजन यांच्या गायीचा व अशोक श्रावण पाटील यांच्या मालकीच्या बैलाचा वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे तसेच कासोदा येथील शांताराम पारधीयांच्या बैलाचाही वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे तीनही पशुधन मालकांना नवीन पशुधन घेण्यासाठी शासकीय मदतीच्या धानादेशाचेही वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकी यासारख्या संकटांना कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलू नये असे आवाहन केले.यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,माजी नगरसेवक चिंतामण पाटील,माजी उपसरपंच साहेबराव पाटील,माजी सरपंच सचिन पाटील,शहरसंघटक मयूर महाजन,जगदीश पाटील यांचे सहपदाधिकारी,महसूल कर्मचारी आणि वारसांचे नातेवाईक उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार