Viral Video: सध्याची तरुणाई सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक रिल्स बनवत असते. रिल्स बनवण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात,त्यासंबंधित अनेक गमतीदार आणि थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये रिल्स बनवण्याच्या नादात तरुणी जखमी झाली. रिल्स बनवण्यासाठी तरुण कोणतीही जागा सोडत नाही. लोकल ट्रेन असेल, प्रवाशांनी गर्दीने भरलेला रेल्वे प्लॅटफॉर्म असेल किंवा भररस्त्यातच असेल जिकडे तिकडे रिल्स बनवतात.
परंतू व्हायरल होत असलेल्या तरुणीनी थेट पुलावर व्हिडिओ बनवला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,’ एका पुलावरुन वाहनांची ये-जा होत आहे. यामध्येच दोन तरुणी आहेत. यांच्या पैकी एक तरुणी तिच्या मैत्रिणीची मदत घेऊन तिच्या खांद्यावर पाय ठेवून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा स्टंट करण्यास तरुणी जाते तेव्हा तीचा उलटी उडी मारण्याच्या प्रयत्न फसवून तिचा अदांज चुकतो. अदांज चुकल्यामुळे रस्त्यावर ती जोरात आपटते.
रस्त्यावर पडताच तिची मैत्रिण तिला येऊन उचल्याच्या प्रयत्न करते आणि त्याच्या बाजूला असलेले इतर व्यक्तीही तिथे येतात.व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @somyagymnast या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. स्टंट करताना तरुणीला जोरदार लागले असल्याचे समजते.
याआधीही स्टंट करताना अनेक गभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचे स्टंट व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तरीही फेमस होण्याच्या नादात स्टंट करण्याचे बंद होत नाहीत. सोशल मीडियावर तरुणींच्या स्टंटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात यूजर्सं व्ह्यूज मिळत आहेत.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.