जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील सरपंच महिलेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, चौकशी करा नातलगांची मागणी

Spread the love

ग्रामसेवकांने संरपंचाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत अपहार केल्याचा आरोप,तक्रार केली होती दाखल.

जामनेर :- तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील सरपंच कल्पना समाधान मेढे यांचे पती यांचा शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यामुळे मृत्यू समाधान मेढे. झाला. मात्र घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. कल्पना समाधान मेढे या अशिक्षित महिलेची आरक्षणामुळे सरपंचपदी वर्णी लागली. ज्यांनी सरपंच केले. त्या शेख गफूर शेख सरदार यांनी ग्रामसेवकाशी संगनमत करून तब्बल नऊ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा संशय समाधान मेढे यांनी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांची भेट घेऊन केला होता.

याबाबत चौकशी करण्यासाठी लेखी तक्रारही केली. दरम्यान शुक्रवारी दुपारी शेख गफुर यांच्या शेतात बैठक असल्याचे सांगून उमेश आहेर समाधान यास घेऊन गेला. तेथूनच समाधान विष प्राशन केलेल्या अवस्थेत घरी पोहोचले.हा प्रकार लक्षात येतात समाधान यास तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रात्री त्यांचा मृत्यू झाला. समाधान यांनी विष प्राशन केले होते किंवा घातपात झाला याची चौकशीची मागणी केली जात आहे.

तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार

ग्रामसेवक पंकज साळवे यांनी आपल्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप कल्पना मेढे यांनी गटविकास अधिकारी यांच्यासह तहसीलदारांकडे केला. याबाबत चौकशी होण्यापूर्वीच समाधान मेढे यांचा मृत्यू झाला. याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली.

तक्रारी केली म्हणून अविश्वास ठराव दाखल

सोबतच्या लोकांनी विचारपूस न करता किंवा माझी स्वाक्षरी न घेता बनावट स्वाक्षऱ्या करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार मेढे यांनी पं.स. सह तहसीलदारांकडे केली होती. तक्रार दाखल करताच सात ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच कल्पनाबाई मेढे व उपसरपंच सरला कापरे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला.

हे पण वाचा

टीम झुंजार