मागील काही दिवसांपासून अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे.हा भव्यदिव्य सोहळा याची देही आणि याची डोळा पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.मात्र, २२ जानेवारीला प्रत्येकाला अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे शक्य नाही. त्यामुळे, अशावेळी घरात राहून रामाचे स्वागत आणि पूजा कशी करावी? याबदद्ल आज आपण जाणून घेणार आहोत.
नवीन मूर्ती खरेदी करा
तुमच्या देवघरात प्रभू श्रीरामाची मूर्ती नसेल तर २२ जानेवारीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर नवीन मूर्ती घरी आणा. त्यानंतर, विशेष मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक करून मूर्तीची पूजा करा. नवीन मूर्तीच्या अभिषेकासाठी आणि विशेष पूजेसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. मूर्तीची स्थापना केल्यानंतर मंत्रांचे पठण करायला विसरू नका.
पूजेसाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :
कुंकू, अक्षता, हळद, गंगाजल, सुपारी, उप मणिबंध (कलावा), तांब्याचा पेला, जल, प्रभू श्रीरामांची प्रतिमा, शुद्ध तूप, अगरबत्ती, धूप, चंदन, फुले, फळे, मिठाई, कापूर, घंटी, थाळी
रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेच्या दिवशी घरी अशा पद्धतीने करा पूजा :
•सोमवारी २२ जानेवारीला पहाटे लवकर उठून अंघोळ करा. अंघोळ केल्यानंतर पांढरे, लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
•त्यानंतर, प्रभू श्रीरामांचे स्मरण करून ज्या ठिकाणी पूजा करायची आहे. ते ठिकाण स्वच्छ करा. संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून वास्तू पवित्र आणि शुद्ध करा.
•ज्या ठिकाणी तुम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करणार आहात किंवा पूजा करणार आहात ते ठिकाण ईशान्य कोपऱ्यात असावे हे लक्षात ठेवा.

•ईशान्य कोपऱ्यात तुमचे देवघर असणे हे शुभ मानले जाते. आता देव्हाऱ्यातील देव स्वच्छ पाण्याने धुवा.
•प्रभू श्रीरामांची प्रतिमा पुसून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्राचा वापर करा.
•त्यावर आता प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा.ही मूर्ती किंवा प्रतिमा पूर्वाभिमुख असावी, याची काळजी घ्या.
•आता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला जलाभिषेक करा. त्यानंतर, पंचामृताने अभिषेक करा.अभिषेक केल्यानंतर मूर्तीला किंवा प्रतिमेला फुले वाहा.
•तुपाचा दिवा लावा.त्यानंतर, अगरबत्ती, धूप लावावी आणि कुंकू, हळद, अक्षता, चंदन, फळे, मिठाई प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला अर्पण करावी.

•त्यानंतर, हनुमान चालीसा, रामचरितमानसाचा पाठ करावा.
•त्यानंतर, शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. आरती झाल्यानंतर खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
•त्यानंतर, घरातील सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.या खास दिवशी संध्याकाळी संपूर्ण घरात आणि अंगणात दिवे लावून दिवाळी साजरी करावी.
•तसेच, संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तूपाचा दिवा नक्की लावावा. हे प्रभू श्रीरामांच्या आगमनाचे प्रतिक मानण्यात आले आहे.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!