Video: आज २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात विविध पद्धतीने आनंद साजरा केला जात आहे. याच ऐतिहासिक कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नागपूरच्या बाबा नानक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेत जय सिया राम गाण्यावर डान्स करत आपला आनंद व्यक्त केला आहे.शाळेतील एका मॅडमने देखील या गाण्यावर डान्स केला आहे.शाळेमध्ये शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासापासून विविध खेळ आणि नृत्य कला देखील शिकवतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे सर्व विद्यार्थी प्राथमिक वर्गातील आहेत.
त्यामुळे शिक्षिकांनी त्यांना डान्स शिकवला. तसेच सर्वांसमोर सादर करताना विद्यार्थी चुकू नयेत म्हणून त्या स्वत: विद्यार्थ्यांसह डान्स करत आहेत.शाळेच्या शिक्षकांनी २२ तारखेला शाळेत राम धुनवर विद्यार्थ्यांच्या डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी शाळेत विद्यार्थ्यांकडून डान्सचा सराव करून घेतला जात आहे. अयोध्या येथे जाऊन मुख्य कार्यक्रमात सहभागी होता आलं नसलं तरी नागपूरच्या शाळेतच अयोध्येसारखी तयारी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांना केला आहे.

राम नामाचा जप करीत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी…
राम मंदिर सोहळ्यासाठी नागपूरमधील शाळांनी उत्फुर्त प्रतिसाद दाखवला आहे. सोमवारी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असणार आहे. या निमित्ताने नागपुरात ‘श्रीराम प्रभात फेरी’चे आयोजन करण्यात आलेय.काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश शाळेच्या वतीने देखील आज प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यासारख्या विविध वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. सोबतच पालखी आणि रथाचाही समावेश या प्रभात फेरीमध्ये होता. राम प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेत २१ दिवसांपासूनच राम नामाचा जप शाळेत सुरू झाला आहे.






