एरंडोलमध्ये समाजकंटकांकडून मध्यरात्री दगडफेक. गाड्यांची तोडफोड.२९ संशयित ताब्यात,शहरात तणावपूर्ण शांतता.

Spread the love

एरंडोल :- आयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त शहरात आयोजितकरण्यात आलेले सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर काल (ता.२२)रात्रीअकरा वाजेच्या सुमारास एका गटातील समाजकंटकांनी अचानक दगडफेक करूनगाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनीत्वरित घटनास्थळी जाऊन दगडफेक करणा-यांवर लाठीमार करून त्यांनापांगवले.सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढकरण्यात आली आहे.पोलिसांनी दगडफेक करणा-या २९ संशयितांना ताब्यात घेतलेअसून काही जन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. समाजकंटकांनीपोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करून काचा फोडल्या.दगडफेकीत पोलिसांसहकाही नागरिक जखमी झाले.

याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील शरद सुकदेव चौधरी या युवकासकास (ता.२२) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका गटातील दोन युवकांनी घरातघुसून मारहाण केली. युवकास मारहाण केल्यानंतर सदर युवकास मारण्यासाठी पन्नास ते शंभर युवकांचा जमाव त्याठिकाणी जमा झाला.याबाबतची माहिती हवालदार अनिल पाटील यांना गांधीपुरा भागात एका युवकास मारहाण करून जमावजमला असल्याचा फोन आला. घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशअहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार अनिल पाटील,अकिल मुजावर,योगेश जाधव,मिलिंद कुमावत हे पोलीस वाहनाने घटनास्थळी दाखल झाले.

चुनाभट्टीपरिसरात असलम रशीद पिंजारी यांचेसह एका गटातील पन्नास ते शंभर युवकत्याठिकाणी जमा झाले होते.सर्व युवक भावना भडकावणा-या घोषणा देत होते. तरदुस-या बाजूला देखील युवकांचा जमाव जमा झाला होता.पोलिसांनी युवकांचा एकाजमावाला थांबवून ठेवले मात्र चुनाभट्टी परिसरातील युवक घोषणा देवून शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.घोषणा देणा-या युवकांना पोलीससमजावण्याचा प्रयत्न करीत असतांना युवकांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली.पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना देवून अतिरिक्त पोलीसबळ घेवून येण्याचे कळवले.अतिरिक्त पोलीसबळ आल्यानंतर पोलिसांनी संतप्त झालेल्या युवकांवर लाठीमार करून त्यांनापांगवले.युवकांनी केलेल्या दगफेकीत सहाय्यक पोलीस गणेश अहिरे यांचेसहकर्मचारी जखमी झाले.

पोलिसांनी लाठीमार सुरु केल्यानंतर युवक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना काही युवक खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले त्यानंतरदेखील युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरूच ठेवली. पारोळा,धरणगाव,कासोदा येथील पोलीस अधिकारी कर्मचा-यांसह शहरात दाखलझाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.पोलिसांनी दगडफेक करणा-या २९युवकांना ताब्यात घेतले असून मुख्य संशयित असलम पिंजारी व त्याचे पंधराते वीस काही साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.त्यानंतर एका गटातील युवकांनी ज्ञानदीप चौकात देखील दगडफेक करून मोटरसायकली आणि चारचाकीवाहनांची तोडफोड केली.तसेच कसाई मस्जिद परिसरात देखील दगडफेक करून दहशतनिर्माण करण्याचा प्रयत्न केला.याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनीदिलेल्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असूनपोलिसांनी २९ संशयितांना ताब्यात घेतले असून फरार असलेल्या मुख्यसंशयितांसह अन्य फरार झालेल्यांचा शोध घेत आहे.

तहसीलदार सुचिता चव्हाणदेखील मध्यरात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होत्या.शहरात ठिकठीकाणीपोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून तिन दंगा नियंत्रण पथक तैनातकरण्यात आले आहेत.आज सकाळी पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांनी शहरात भेटदेवून घटनेची माहिती जाणून घेतली.चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपअधीक्षक सुनील नंदनवाळ शहरात तळ ठोकून आहेत.दुपारी चारवाजेच्या सुमारास आमदार चिमणराव पाटील यांनी पोलीसस्टेशनला भेट देवून माहिती जाणून घेतली.शहरात वाड निर्माण करणा-या समाजकंटकांविरोधात कडककारवाई कारच्या सुचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केल्या.शहरात विविध अफवा पसरविल्या जात असल्यामुळे प्रमुख बाजरापेठेसः अन्य भागातीलव्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.नागरिकांनी कोणत्याही अफवांवरविश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

टीम झुंजार