कोल्हापूर :- खेळण्यावरुन भांडणं होणं आणि रुसवे फुगवे धरुन बसणं हे काही नवीन नाही. मात्र त्याचा राग आपल्याच मित्राच्या जीवावर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.खेळण्याच्या रागातून 11 वर्षांच्या मुलीने साडे चार वर्षांच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही घटना कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कोथळी इथे घडली आहे. चार वर्षाच्या मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार घडकीस आणला आहे.या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असून तिला बालन्यायलयात हजर करण्यात येणार आहे. कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणार्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता होता.
रात्री उशीरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते. वीटभट्टीजवळ असणार्या सीसीटीव्हीची मदत घेतली. 11 वर्षीय मुलीने मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेवून जात असल्याचे यामध्ये दिसलं आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला.जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी सापडला.
मृत मल्लिकार्जुन आणि 11 वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणातून वाद होत होते.हा राग मनात ठेवून या 11 वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात धकलून जीव घेतल्याचं सत्य समोर आलं. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदेन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.