Viral Video: नवरदेवाची एन्ट्री पाहून वऱ्हाडी व नातेवाईक अगदी आश्चर्याने बघत राहिले तुम्हीही व्हाल आवाक् पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video :- लग्न हे प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकजण लग्नात काहीतरी स्पेशल गोष्टी करतात. आजकाल लग्नात काहीतरी स्पेशल आणि हटके एन्ट्री घेण्याची क्रेझ आहे.त्यासाठी अनेकजण रथ, घोडा किंवा अगदी बैलगाडीतूनदेखील एन्ट्री घेतात. मात्र, एक नवरदेवाने चक्क जेसीबीमधूनच लग्नमंडपात एन्ट्री घेतली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्न म्हटलं की नवरा-नवरी वेगवेगळ्या अंदाजात एन्ट्री घेतात. अनेकदा डान्स करत, गाणी गात नवरा नवरी एन्ट्री घेतात. तसेच गावाकडे अनेकदा घोडा, रथ किंवा बैलगाडीतून नवऱ्याची मिरवणूक काढली जाते. परंतु आता नवऱ्याचे चक्क जेसीबीवरुन एन्ट्री घेतली आहे.व्हायरल व्हिडिओत एका ओपन ग्राउंडवर लग्नसोहळा आयोजित केला आहे. या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवऱ्याची एन्ट्री. लग्नमंडपात नवऱ्याने चक्क जेसीबीवरुन एन्ट्री घेतली आहे. जेसीबीच्या वर चढून नवरदेव लग्नमंडपात आला आहे. नवऱ्याने एन्ट्री घेताच उपस्खिक नातेवाईक अगदी आश्चर्याने बघत होते.

@ck_official_555 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. घोडा,रथ आणि आता जेसीबी, नवऱ्याची हटके स्टाईल, वऱ्हाडी मंडळी तर आश्चर्यचकितच झालेत अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहे.

https://www.instagram.com/reel/C2VDDvahvxf/?igsh=ZDc1cm5kY2VhcnJx

हे पण वाचा

टीम झुंजार