मुंबई :- लग्नाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार केले, तसेच मुलासह नातेवाइकांनी सुरुवातीला ३० लाखांचा ऐवज उकळून आणखीन २ बीएचके प्लॅट, ६० लाखांची कार आणि १०० तोळे सोन्यासाठी ब्लॅकमेल केल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आरएके मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वडाळा परिसरात २४ वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. तिचे रिजवान खानसोबत लग्न ठरले.
रिजवानसह इश्तियाक खान (५७), रेहाना खान (५३), फरहीन खान (२३), फैजान खान (२७), नियाज खान (५५), इसहाक खान (४५) आणि रुक्सार खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी आतापर्यंत २५ लाखांची रोकड, १५ लाखांचा महागडा फोन, दोन लाखांचे घड्याळ आणि सोन्याची चेन, ५० जोडे कपडे, लोकांना सव्वा लाखांचे पाकीट असा एकूण ३० लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज मागितला.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आरोपींनी दोन टू बीएचके प्लॅट, ६० लाखांची कार आणि १०० तोळे सोन्याची मागणी केली. तक्रारीनुसार, आरोपींनी लग्नाचे जाळे टाकून त्यांच्या लग्नाच्या नावावर तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ३० लाखांचा घेतला. अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांना ब्लॅकमेल केले. एवढ्यावरच न थांबताच तरुणीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पोर्नोग्राफिक व्हिडीओ पाठवून शारीरिक संबंध ठेवले. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच दोघांचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर आरोपींची मागणी वाढताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






