विवाहित महिलेचे अनैतिक संबंध,पती गेला शेतात प्रियकर आला घरी, दोघ एकांतात अन् जे घडलं ते धक्कादायक

Spread the love

अकोला :- अनेक ठिकाणी नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. आता अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. प्रियकराने विवाहित महिलेचा गळा चिरुन खून केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत पोलीस तपास करत आहेत.मूर्तिजापूर तालुका येथील माना येथे ही घटना घडली आहे. एका प्रियकराने विवाहित महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे.

ही महिला लोहरी गावातील एका तरुणाच्या संपर्कात आली होती. नंतर त्यांची चांगलीच ओळख वाढली होती.आरोपी हा महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत महिलेच्या घरात शिरला ते गप्पा मारत असताना अचानक दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढत गेला की आरोपीने महिलेच्या गळ्यावर आणि पायावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःही आपला गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाचला आहे.

त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माना पोलीस अधिक तपास करीत आहे. याबाबत पोलीस म्हणाले की, प्रियकर महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचवेळी महिलेचा पती शेतात गेला होता. घरात ती एकटीच होती. काहीवेळा ते आतच होते. मात्र नंतर त्यांच्यात वाद झाला. याचा आवाज देखील बाहेर आला.यामुळे प्रियकराने महिलेची हत्या केली आणि स्वतःवरही वार केले. तो गंभीर जखमी झाला असून त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे सगळेच हादरले असून याबाबाब पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार